वेळ सारखी नसते

एखाद्याने २२ व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याला ५ वर्षे लागली.

एखादा २५व्या वर्षी एका मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि वयाच्या ५०व्या वर्षी वारला.

एखादा वयाच्या ५०व्या वर्षी मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि ९५ वर्षे जगला.

एखाद्याचं लग्न वयाच्या विसाव्या वर्षी झालं, एखाद्याचं ४०व्या वर्षी झालं तर एखादा अजूनही अविवाहित आहे.

ओबामा ५५व्या वर्षी रिटायर झाला आणि ट्रम्पने ७०व्या वर्षी सुरुवात केली.

या जगात प्रत्येक जण आपापल्या ‘टाईमझोन’ मध्ये काम करत असतो.
काही लोक आपल्या ‘किती पुढे गेलेत?’ असं वाटत राहतं तर काही लोक आपल्या मागे पडल्यासारखे आपल्याला भासतात.
पण खरं सांगू? इथे प्रत्येक जण आपली स्वतःची शर्यत आपल्या स्वतःच्या विशिष्ट ‘टाइमझोन’ मध्ये धावत असतो. जिथे तुम्ही एकटेच पळताय!

पुढे जाणाऱ्यांवर जळू नका. मागे पडलेल्यांवर हसू नका.
ते त्यांच्या ‘टाइम झोन’ मध्ये आहेत आणि तुम्ही तुमच्या!
चिंता सोडा! अहंकार सोडा!! रिलॅक्स व्हा!!!

तुम्ही कुणाच्याच ‘पुढे’ नाही!
तुम्ही कुणाच्याच ‘मागे’ नाही!!

Live life simple… Live life happy! 😄👍🏻
#Relax #TimeZone #Inspiration