दि. 13 जानेवारी 2025
मुंबई अहमदाबाद हायवेवर सफाळे फाट्यानजीक असलेल्या सातिवली गावात नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक गरम पाण्याचे कुंड आहेत. औषधी गुणधर्माने युक्त असलेल्या या पाण्यात अंघोळ केल्याने शरिराचा थकवा तर दूर होतोच, पण अनेक व्याधीही बऱ्या होतात. पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळी सोय इथे आहे. या ठिकाणी मुख्यत्वे नवनाथांचे आणि शंकराचे मंदीर असून इतर देवदेवतांचीही मंदीरे आहेत. अत्यंत स्वच्छ, निसर्गाच्या सान्निध्यात, शांत आणि कमी गर्दी असलेल्या या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि निसर्गाचा चमत्कार अनुभवा.
दि. 5 जानेवारी 2025
गेल्या ५ दशकांपासून सुरु असलेल्या #09023 / 24 वलसाड फास्ट पॅसेंजरचे डबल डेकरचे डबे त्यांचे आयुष्यमान संपल्यामुळे बदलले जाणार असून त्याऐवजी सिंगल डेकरचे डबे या गाडीला लावले जाणार आहेत. त्यामुळे सहाजिकच या गाडीने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांशी नाते जोडलेल्या या डबल डेकर डब्यांना समर्पित हा खास व्हिडीओ. हे डबे आता आपल्याला दिसणार नाहीत, पण माझ्यासारख्याअनेक प्रवाशांच्या आयुष्यात त्यांचे स्थान सदैव राहील.
दि. 11 डिसेंबर 2024
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. आपण तिथले पॉईंट्स पाहतो, पण ज्या नावाने हे ठिकाण प्रसिद्ध आहे, त्या शंकराच्या प्राचीन मंदिराबद्दल फार थोडी माहिती असते. या व्लॉग मध्ये ओल्ड महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिर, महाबळेश्वर मंदिर अतिबळेश्वर मंदिर, कृष्णाबाई मंदिर आणि वाई येथील प्रसिद्ध ढोल्या गणपती मंदिर आणि तिथलाच विश्वेश्वर मंदिर यांचे थोडक्यात वर्णन केले आहे. हा व्हिडीओ संपूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा आणि सूचना असल्यास कमेंट करा.
दि. 23 नोव्हेंबर 2024
माझा कास पठाराला जाताना प्रवासात अनुभवलेले निसर्गसौंदर्यही तितकेच प्रेक्षणीय होते, आणि ते दाखविण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. आमचा कास पठार ला जाण्याचा प्रवास विरार, ठाणे, पुणे, सातारा, मेढा, बामणोली, कास असा होता. कास हे तर डेस्टीनेशन होते, पण तिकडे जाताना सह्याद्रीचे निसर्गसौंदर्य, घाटरस्ते, धबधबे इत्यादींचा अनुभव डोळ्याचे पारणे फिटवणारा होता. हा व्हिडीओ पूर्ण पहा आणि आमच्या प्रवासातले निसर्गसौंदर्त अनुभवा.
दि. 9 नोव्हेंबर 2024
दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी कास पठार सर केले. दर वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर महीन्यात “कास पठार” या ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेल्या पठारावर दुर्मिळ रानफुले फुलतात. महाराष्ट्राला लाभलेल्या 7 नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक असलेल्या आणि सन 2012 साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत स्थान पटकावलेल्या या पठाराबद्दल विस्तृत माहिती मी या व्हिडीओ ब्लॉगमधून देण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ पूर्ण पहा आणि कास अनुभवा.
दि. 31 ऑक्टोबर 2024
या व्हिडीओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्टबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आहे. तसेच एअरपोर्टवर विमानात चढेपर्यंत होत असलेल्या प्रक्रिया समजाविण्याचा प्रयत्न केला आहे.
दि. 7 फेब्रुवारी 2024
मुंबईतले सर्वात जास्त पर्यटकांनी भेट दिलेले ठिकाण म्हणजे दक्षिण मुंबईतला काळा घोडा परिसर. या व्हिडिओत काळा घोडा परीसरातील गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, राजा छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय, आर्ट स्ट्रीट, जहाँगीर आर्ट गॅलरी आणि मरीन ड्राईव्ह बद्दल माहिती दिली आहे.
दि. 15 डिसेंबर 2023
मुंबई पासून 50 किमी दूर सफाळे स्टेशनजवळच्या तांदुळवाडी किल्ल्याची एक दिवसाची ट्रेक, माहितीपूर्ण व्हिडीओ. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या.
दि. 8 डिसेंबर 2023
विरार स्टेशनपासून 4 किमी वर असलेल्या बारोंडा देवी हिल ची एक छोटेखानी सफर (हिंदीतून)