संत रोहिदास आळी, एडवण ता. जि. पालघर या आमच्या आळीत सार्वजनिक गणेशोत्सवासह अनेक सामाजिक, धार्मिक उत्सव आनंदाने व नित्यनेमाने गेली कित्येक वर्षे साजरे केले जातात. आमच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना सन 1959 साली झालेली आहे. परंतु कोणतेही उत्सव साजरे करण्यासाठी आळीच्या मध्यभागी कायमस्वरूपी जागा उपलब्ध नसल्याने अनंत अडचणीना सामोरे जावे लागते. उत्सव साजरा करण्यासाठी, विविध सामाजिक कार्यक्रमासाठी त्याचबरोबर गावातील सर्व समाज बांधवात सलोखा निर्माण होण्यासाठी आळीच्या मध्यवर्ती ठिकाणी सभागृह (समाज मंदिर) असावं असा विचार पुढे आला.
समाज बांधवांची ही अडचण लक्षात घेऊन आमच्या गावच्या माहेरवाशीण कु. अस्मिता बाबुराव जाधव (आताच्या सौ. अस्मिता निलेश जाधव) यांनी आपल्या मालकीची जागा या सभागृहाच्या इमारतीसाठी दिली आहे. अशा प्रकारचे दान देऊन त्यांनी आपल्या समाजासमोर एक कौतुकास्पद आदर्श निर्माण केला आहे. सद्यस्थितीत त्यांनी दिलेल्या जागेवर सभागृहाची उभारणी करण्यासाठी रुपये 18 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. आपण सामाजिक जाणीवेतून या सभागृहाच्या उभारणीसाठी यथाशक्ती आर्थिक योगदान देऊन आम्हास उपकृत करावे ही नम्र विनंती.
आपले नम्र
श्री. जगदीश सो. जाधव – अध्यक्ष
श्री. किरण पां. जाधव – उपाध्यक्ष
श्री. वैभव ह. सातवे – चिटणीस
श्री. विनोद सातवे – सहचिटणीस
श्री. दिलीप पां. जाधव – खजिनदार
व समस्त संत रोहिदास गाव मंडळ एडवण पदाधिकारी आणि सभासद.