संत रोहिदास समाज मंदीर, एडवण, जिल्हा पालघर

संत रोहिदास आळी, एडवण ता. जि. पालघर या आमच्या आळीत सार्वजनिक गणेशोत्सवासह अनेक सामाजिक, धार्मिक उत्सव आनंदाने व नित्यनेमाने गेली कित्येक वर्षे साजरे केले जातात. आमच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना सन 1959 साली झालेली आहे. परंतु कोणतेही उत्सव साजरे करण्यासाठी आळीच्या मध्यभागी कायमस्वरूपी जागा उपलब्ध नसल्याने अनंत अडचणीना सामोरे जावे लागते. उत्सव साजरा करण्यासाठी, विविध सामाजिक कार्यक्रमासाठी त्याचबरोबर गावातील सर्व समाज बांधवात सलोखा निर्माण होण्यासाठी आळीच्या मध्यवर्ती ठिकाणी सभागृह (समाज मंदिर) असावं असा विचार पुढे आला.
समाज बांधवांची ही अडचण लक्षात घेऊन आमच्या गावच्या माहेरवाशीण कु. अस्मिता बाबुराव जाधव (आताच्या सौ. अस्मिता निलेश जाधव) यांनी आपल्या मालकीची जागा या सभागृहाच्या इमारतीसाठी दिली आहे. अशा प्रकारचे दान देऊन त्यांनी आपल्या समाजासमोर एक कौतुकास्पद आदर्श निर्माण केला आहे. सद्यस्थितीत त्यांनी दिलेल्या जागेवर सभागृहाची उभारणी करण्यासाठी रुपये 18 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. आपण सामाजिक जाणीवेतून या सभागृहाच्या उभारणीसाठी यथाशक्ती आर्थिक योगदान देऊन आम्हास उपकृत करावे ही नम्र विनंती.

आपले नम्र
श्री. जगदीश सो. जाधव – अध्यक्ष
श्री. किरण पां. जाधव – उपाध्यक्ष
श्री. वैभव ह. सातवे – चिटणीस
श्री. विनोद सातवे – सहचिटणीस
श्री. दिलीप पां. जाधव – खजिनदार
व समस्त संत रोहिदास गाव मंडळ एडवण पदाधिकारी आणि सभासद.

तारखेवार अपडेट

2024
पहिल्या मजल्यावरील भिंती उभारणी पूर्ण
पहिल्या मजल्यावरील भिंती उभारणी पूर्ण
अंतर्गत जिन्याचे काम पूर्ण होवून पहिल्या मजल्यावरील भिंतींचे काम प्रगतीपथावर
अंतर्गत जिन्याचे काम पूर्ण होवून पहिल्या मजल्यावरील भिंतींचे काम प्रगतीपथावर
निधी संकलनासाठी मराठी बाणा कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
निधी संकलनासाठी मराठी बाणा कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

चौरंग प्रस्तुत श्री. अशोक हांडे निर्मित मराठी बाणा या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रबोधनकार ठाकरे नाट्यग्रृह, दहिसर, मुंबई येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद लाभला. श्री. अशोक हांडे यांनी व्यक्तिशः संत रोहिदास गाव मंडळाचे व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. संत रोहिदास सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संदेश जाधव यांनी सर्व उपस्थितांचे व सभागृहास देणगी देणाऱ्या देणगीदारांचे आभार मानले. या प्रसंगी श्री. अशोक हांडे यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

पहिल्या मजल्याचे काँक्रीट फ्लोअरचे काम पूर्ण
पहिल्या मजल्याचे काँक्रीट फ्लोअरचे काम पूर्ण

फोटोमध्ये तळमजल्याच्या सर्व भिंती पूर्ण झाल्याचे, खिडक्यांचे सज्जा, जिन्याचा संपूर्ण भाग आणि पहिल्या मजल्याचे संपूर्ण फ्लोअर एरीया काँग्रीटीकरण पूर्ण झाल्याचे दिसत

आहे.

मराठी बाणा कार्यक्रमाच्या तिकीट वाटपासाठी विविध ठिकाणी भेट

मराठी बाणा कार्यक्रम – तिकीट विक्री
मराठी बाणा कार्यक्रम – तिकीट विक्री

श्री. हरेश्वर का जाधव, विरार, यांच्या घरी मराठी बाणा कार्यक्रमाची तिकीट विक्री करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची भेट.

ओशिवरा येथील चर्चा संपवून परतताना
ओशिवरा येथील चर्चा संपवून परतताना

उशीरापर्यंत चाललेली चर्चा संपवून सर्व पदाधिकाऱ्यांनी नव्याने सुरु झालेल्या ओशीवरा मेट्रो लाईनने बोरीवलीपर्यंत प्रवास केला.

मराठी बाणा कार्यक्रमाला अंतिम रुप
मराठी बाणा कार्यक्रमाला अंतिम रुप

समाज मंदीराच्या निधी उभारणीसाठी ओशीवरा येथे श्री. भूषण केळवेकर यांच्या घरी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रमाला अंतिम रुप दिले. या सभेदरम्यान नाट्यमंदीराची एकूण क्षमता आणि तिकिटांचे दर निश्चित करण्यात आले.

अंतर्गत जिन्याचे काम सुरु
अंतर्गत जिन्याचे काम सुरु

तळमजल्यावरील सर्व भिंतींचे काम झाल्यानंतर पिलरचेही काम करण्यात आले. पिलर साठी लावण्यात आलेले सपोर्ट काढलेले या फोटोमध्ये दिसत आहेत. त्यानंतर वरील मजल्यावर जाणाऱ्या जिन्याचे काम सुरु करण्यात आले.

भिंतींचे काम पूर्ण, वरुन दिसणारे बांधकामाचे दृष्य
भिंतींचे काम पूर्ण, वरुन दिसणारे बांधकामाचे दृष्य