आयुष्यभराची प्रतिष्ठा एका अन्यायी कृतीमुळे गमवावी लागते…

🔸महाभारतातील युध्द संपवून श्रीकृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली… 🔸गुरू द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह यांना ठार मारणार्यांच्या बाजूने तुम्ही कसे काय उभे राहिलात ? 🔸श्रीकृष्णांनी उत्तर दिले… “ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले…” […]

आपल्या आयुष्याचे सी.ई.ओ. बना

प्रत्येकाने वाचावा असा अप्रतिम लेख… दोन दिवसांपूर्वीची गोष्ट.. कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो. मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसी ची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो. पेपर खरं तर, नांवाला. माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून […]

आज काय छान वाटलं ??

रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत…. याचं उत्तर माझ्या एका मित्राकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. तो म्हणाला की आम्ही एकामेकांशी बोलायला […]

ॲनॉटॉमी ऑफ ठाकरे फॅमिली

– राजू परुळेकर तसं बघायला गेलं तर आजच्या राजकीय सख्ख्या आणि चुलत ठाकरे कुटुंबापुढे बाळासाहेब ठाकरे हे सूर्यच होते. सूर्य याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे सूर्य होते असा जश्याचा तसा नाही. त्याविषयी मी २००३ साली ‘शिवसेना : भासमान आणि वास्तविक’ या लेखात लिहिलेलं आहे. तो लेख माझ्या ‘आयडीयाज आर डेंजरस’ या पुस्तकात समाविष्ट आहे. हा लेख […]

कॅलिडोस्कोप –हे बैल आणि ते बैल!

-निखिल वागळे –  जानेवारी 25, 2017 परंपरेच्या नावाखाली अस्पृश्यतेच्या प्रथेचं पुनरुज्जीवन करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल किंवा आरक्षणाला आव्हान देण्याचा राजकीय डाव कुणी खेळत असेल तर त्याला घटनात्मक मार्गाने वेळीच उत्तर द्यायला हवं. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालवला जातो, मनुस्मृतीनुसार किंवा बायबल वा शरियानुसार नाही याचं भान सतत ठेवणं आवश्यक आहे. कालबाह्य […]

सुखी संसारासाठी उपयुक्त योगासने

*महिलांची  योगासने…….* 1)  *गिरमिटासन*  :   नवरा  जरासा  निवांत टेकला  की,  वेगवेगळ्या   मागण्यांचे  टुमणे  त्याच्यामागे  गिरमीट  लावल्यासारखे   लावून  द्यावे.  तो  वैतागून   कोपला  की  अश्रूपा:त  करूनच  थांबावे.  हमखास  फायदा  होतो.  2) *विभ्रमासन* :   सेल  लागल्यावर   करणे.  यासाठी नवरा  कामावरून  घरी  परतल्यावर  लगेच  गरमागरम  पोहे ,   आलं  घातलेला  फक्कड  चहा देणे  अपरिहार्य  आहे.   नंतर  लाडीक  विभ्रमांचा मारा  केला  […]

ग्रेट रतन टाटा

” एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या अति महत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर , एका ठिकाणी तातडीच्या मिटिंग ला निघाला होता . . मोठी आलिशान गाडी होती . आणि प्रवास साधारण तीन चार तासाचा होता . सर्वजण सकाळी लवकर निघाले होते . गाडी वाटेत आल्यावर . . गाडीच्या ड्रायव्हर ला लक्षात आले कि मागील एक चाक […]

स्वामी विवेकानंदांची अतिशय महत्त्वाची वाक्ये

🌝शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. 🌝 स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा […]

सावित्रीमाई कोण होत्या?

सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:- • मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय फुले दाम्पत्य होय. याप्रकारे त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरु केले. • मुलींच्या शाळांच्या पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका. • शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन (curriculum planning) करणाऱ्या, व अभ्यासक्रम तयार करून राबविणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञ. “अभ्यासक्रम नियोजन” हा विषय आज […]

स्त्री मुक्तीच्या आद्यप्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

संकलक हर्षद जाधव (ब्रेल जागृती मराठी ब्रेल त्रैमासिकाच्या जानेवारी-मार्च २०१३ च्या अंकातून साभार.) काटेरी अंथरुणावर जन्माला येऊन त्या अंथरुणाची ज्यांना सवय होते ते सामान्य म्हणून जगतात पण बोचणार्‍या काट्यांची ज्यांना जाणीव होते आणि हक्काचं सुख मिळविण्याची ज्यांच्यात हिम्मत असते ते असामान्य होतात. भारत नावाच्या पुरुषप्रधान अडथळ्यातून वाट काढत प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला ज्ञानामृताचा आनंद देणार्‍या सावित्रीबाई […]