*गाणगापूर येथील कल्लेश्वर स्थान महात्म्य काय आहे..?*
》माहिती: कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात.कल्लेश्र्वर हे मुक्तीस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहे

*गाणगापूर येथील संगम स्थानाचा काय महिमा आहे ?*
》माहिती :: भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्ती पीठावर झाला आहे .सदरील संगम निर्गुण मठापासून २ ते ३ किलोमीटर आहे.या संगम स्थानी “भगवान श्री नृसिंह सरस्वती ” नित्य स्नान करत असत. या संगमा भोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे. या संगमात स्नान केल्याने भाविकाचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित.निर्गुण मठाच्या पादुका दर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात.पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते.

*गाणगापूर दर्शन*: गाणगापूर येथे “दत्त महाराजांचा दिव्य अवतार “श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी २२ ते २३ वर्ष वास्तव्य केले “.या संपूर्ण क्षेत्र मध्ये, संगम स्नान (भीमा +अमरजा नदी संगम ),निर्गुण पादुका दर्शन ,भस्म महिमा ,अष्ट तीर्थ महिमा ,माधुकरी ,संगमेश्वर मंदिर ,औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा,निर्गुण पादुका महात्म्य आहे ,या दिव्य भूमीचे दर्शन भाविकांना व्ह्वावे हाच स्वामी दर्शन चा उद्देश आहे ..

*गाणगापूर येथील अष्ट तीर्थांची काय नवे आहेत ..?*
》माहिती :गाणगापूर च्या काही अंतरावर भीमा-अरमजा-संगम आहे. गाणगापूरच्या परिसरांत
१ ) षट्‍कुलतीर्थ,
२)नरसिंहतीर्थ,
३)भागीरथीतीर्थ,
४)पापविनाशीतीर्थ,
५)कोटितीर्थ,
६)रुद्रपादतीर्थ,
७) चक्रतीर्थ आणि
८) मन्मथतीर्थ अशीं अष्टतीर्थे आहेत.

*गाणगापूर येथील औदुंबर वृक्षाचा काय महिमा आहे …?*
》माहिती :: संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे.या वृक्ष मध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे.या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्या आहे.हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधी मुक्त झाले आहे.आपणास कधीहि गाणगापूर येथे जाण्यास योग आल्यास संगम स्नान करून औदुंबरास -११,२१,१०८ प्रदक्षिणा नक्की घाल्याव्यात.आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचा दिव्य वरदान आहे.या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक “गुरुचरित्र ” या जागृत ग्रंथाचे पारायण करतात.

*गाणगापूर येथील “भस्माचा डोंगर “या स्थळा बद्दल काय स्थान महिमा आहे ?*
》माहिती : भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्व आहे सदरील भूमी मध्ये अनेक प्रकारचे राज यज्ञ,ऋशी मुनींनी केलेली तप साधना यामुळे या तापोभूमितील “विभूती” अनेक भाविक घरी घेऊन जातात,त्याच प्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासठी येथील पाषाण द्वारे रचना तयार करायची सुधा एक पद्धत आहे.

*गाणगापूर दिव्य निर्गुण पादुका यांचे काय महात्म्य आहे ?*
》माहिती :– “दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे:.अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदी मधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त जाहल्या नंतर सर्व भक्तांना या पादुका स्थळी “श्री नृसिंह सरस्वती”महराजांनी दर्शन दिले.

*पादुका विशेष* :–
वाडीच्या पादुकांना ‘मनोहर पादुका’ म्हणतात, तर गाणगापूर तेथील पादुकांना ‘निर्गुण पादुका’ अशी संज्ञा आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात कुठलाही पाणी स्पर्श नाही.या पादुका चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पूजोपचरांसाठी ताम्हणांत ‘उदक’ सोडतात.