मोठी बातमी सिल्लोड:

सर्व देशात मुस्लिम समाजाने रमजाने ईद उत्साहात साजरी केली आहे. नवीन कपडे परिधान केलेले मुस्लिम एकमेकांना शुभेच्छा देताना सर्वत्र बघायला मिळाले आहेत. मात्र, एक गाव असं आहे, ज्या गावतील मुस्लिम समाजाने ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला होताे. गावातील कोणताच मुस्लिम व्यक्ती ईद च्या दिवशी नवीन कपडे परिधान केले नाही. याऊलट या गावात काळी फित बांधून नमाज अदा करण्यात आली. हे गाव ईदचा आनंद साजरा का केला नाहीत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचं करणं जर समजलं तर तुम्हला या मुस्लिम समाजाचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.

सिल्लोड तालुक्यातील शहीद जवान संदीप जाधव यांना श्रद्धांजली म्हणून अंधारी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने ईद न साजरी करण्याचा निर्णय मुस्लिम गावकऱ्यांकडून घेण्यात आला होता. सिल्लोड तालुक्यातील संदीप जाधव यांना जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आला होता या घटनेनंतर संपूर्ण राज्याने हळहळ व्यक्त केली. सिल्लोड तालुक्यातही दुःख पाहायला मिळालं.

अंधारी या गावात जवळपास पंधराशेपेक्षा जास्त मुस्लिम नागरिक राहतात. पूर्ण जगात सर्वत्र ईद साजरी होत असताना आपल्या तालुक्यातील जवान देशासाठी लढता लढता शहीद झाला म्हणून आपण ईदचा आनंद कसा साजरा करायचा हा प्रश्न गावकऱ्यांना सतावत होता. म्हणून गावातील सर्व मुस्लिम नागरिकांनी वर्षातला सर्वात मोठा सण ईद न साजरी करण्याचा इतिहासिकनिर्णय घेतला होता. रीतीप्रमाणे केवळ साध्या पद्धतीने नमाज अदा केली. गावातील कोणत्याही मुस्लिम समाजातील व्यक्तीने नवीन कपडे परिधान केले नाहीत. नमाज अदा केलेल्या ठिकाणी पाकिस्तानाचा निषेध करत घोषणाबाजी केली. ठीकठिकाणी पाकिस्तान मुर्दाबाद, शहीद जवान अमर रहे असे फलक बघायला मिळाले. त्यामुळे एकीकडे हिंदू-मुस्लिम वाद लावणारे आणि दहशतवादी म्हणजे मुस्लिमच अशा गोष्टी पेरून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या नेत्यांना ही एक चपराक म्हणावे लागेल.