सध्याला 90’s kid हा मोठा ट्रेंड पाहायला मिळतो आहे. याला कारणही तसेच आहे, 90’sच्या मुलांनी त्यांच्या लहानपणी जे बालपण अनुभवले ते आता पुन्हा कुणालाच अनुभवायला मिळणार नाही. त्यामुळेच हा काळ अनेक गोष्टीसाठी महत्वपूर्ण आहे. या पिढीने जगाला झपाट्याने बदलताना पाहिले आहे. ते पाहून थांबले नाहीत तर काळानुसार बदलेले आहेत.

👉 90’s kids विडीओ गेम खेळण्यात माहीर असायचे. त्यात आपल्या बहिण-भावांपेक्षा जास्त स्कोर करणे म्हणजे वर्ल्ड कप जिंकल्यासारखे होते.

👉 याच काळात क्रिकेटची प्रचंड क्रेज होती. सगळीकडे क्रिकेट हा एकच धर्म होता. राहुल द्रविड, सचिन तेंडूलकर किंवा सौरव गांगुली यांच्यापैकी कोणी आउट झाले की सर्वजण टीव्ही बंद करून क्रिकेट खेळायला निघून जायचे.

👉 चाचा चौधरी आणि टिंकल कॉमिक हे या काळात आवडते टाईमपास. तसेच ‘शक्तिमान’ हा सर्वांचा सुपरहिरो, आजही सर्वाना तो आठवतो.

👉 ‘जंगल जंगल बात चली है पता चला है! अरे चड्डी पेहेनके फुल खिला है फुल खिला है!…’ हे जिंगल आजही सर्वांचे तोंडपाठ असेल. त्यातला मोगली, बगीरा आणि भालू हे तर हे न विसरण्यासारखे कॅरॅक्टर.

👉 शाकालाका बूम बूम, नंदू अपना या सिरिअल्स तर न चुकता बघणारी ही मंडळी. यासाठी खास वेळ राखून ठेवला जायचा.

👉 90च्या दशकात summer vacations म्हणजे ‘मामाच्या गावाला जाऊ या’ हा सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम असायचा.

👉 रविवार हा दिवस म्हणजे केस कापण्याचा आणि क्लिनिक प्लसने केस धुण्याचा दिवस. त्यानंतर दूरदर्शवर रांगोली व दुपारी 4 वाजता चित्रपट पाहण्याची मजा वेगळीच असायची.

👉 90च्या दशकातील महाभारताची क्रेझ लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांचीच होती. जेव्हा महाभारत टीव्हीवर यायचं तेव्हा संपूर्ण भारत ठप्प व्हायचा.

👉 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला लागणारा बॉर्डर चित्रपट हा सर्वांचा फेवरेट असायचा. यातील गाणेच काय तर एकूण एक डायलॉग देखील यांचा पाठ असायचा.

👉 या पिढीतील मुलांना ‘black and white’ TV कशी होती हेही माहित आहे आणि रंगीत TV देखील. टीव्ही असेल, मोबाईल असेल इंटरनेट असतील अशा सर्वांचे बदल यांच्या वाढत्या वयोमानानुसार झाले आहेत.

👉 म्हणूनच 90’s kids हे स्वतःला नशीबवान समजतात. कारण यांनी डीजीटीलाईझेशनच्या अगोदरचा काळ पाहिलाय आणि नंतरचाही.