या उपायांमुळे अ‍ॅलर्जी होण्याचा धोकाच नाही !!
  

तुमच्या घरात घाण आणि आजार पसरविणाऱ्या जीवांनी थैमान घातले आहेत. या जीवांना पळविण्याची सहज पद्धत सूचत नाही तर आम्ही तुम्हांला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

सर्वांत चांगली गोष्ट आहे की यामुळे कोणतेही इन्फेक्शन होत नाही. तसेच लहान मुलांसाठी हे उपाय खूप सुरक्षित आहेत.

१. उंदरांपारून मुक्ती
उंदरांना पेपरमिंटचा वास बिल्कूल पसंद नाही. घरात उंदीर थैमान घालत असतील तर कापसावर थोडे पेपरमिंट (अस्मंतारा) टाका, त्याने तेथे उंदीर येणार नाहीत, पळून जातील. या वासाने श्वास गुदमरतो, त्यामुळे ते मरून जातात.

२. झुरळांपासून मुक्ती
काळी मिरे, कांदे आणि लसूनची पेस्ट करून त्यात पाणी टाका आणि एक सोल्युशन तयार करा. ते झुरळ असलेल्या जागांवर स्प्रे करा. याचा वासाने झुरळ घर सोडून पळून जातील.

जरूर वाचा

हा सोपा उपाय केला, तर घरातून पाल पळून जाते
३. घरमाशांपासून मुक्ती
घरमाशांना घरापासून दूर ठेवण्यासाठी आपण घर स्वच्छ ठेवतो किंवा दरवाजे बंद ठेवतो. असे असूनही घरमाशा घरात येतातच. त्यावर उपाय म्हणून कापसाच्या बोळ्याला एका उग्रवास असलेल्या तेलामध्ये बुडवून दरवाज्याजवळ ठेवा. तेलाच्या वासाने घरमाशा दूर पळतात. हा उपाय करून पाहा माशा त्वरीत पळून जातील.

४. ढेकूणला मारा
कांद्याचा रस ढेकणाला मारण्यासाठी नैसर्गिक औषधी आहे. याच्या वासाने त्यांचे श्वास बंद होतो आणि ते त्वरित मरतात.

येत्या काही दिवसांत दिवाळीच्या फराळासोबतच घराच्या साफसफाईलादेखील सुरवात होईल. अनेकदा स्वयंपाकघरात किंवा बेडरूममध्ये किड्या-मुंग्या होऊ नयेत म्हणून काही पेस्टीसाईड्स किंवा केमिकल्सयुक्त औषधांचा फवारा मारला जातो. पण यामुळे अ‍ॅलर्जी होण्याचा धोका अधिक असतो. काहींना यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास संभवू शकतो. म्हणूनच यापासून बचावण्यासाठी काही नैसर्गिक उपायांचा वापर करा आणि घरासोबतच तुमचे आरोग्यही सांभाळा.

मच्छरपासून बचावासाठी लसूण –
स्वयंपाकघरात आवर्जून आढळणारे लसूण वासाला उग्र आहे. या उग्र वासामुळे मच्छर दूर राहण्यास मदत होते. यासाठी लसणाच्या काही पाकळ्या ठेचून पाण्यात उकळा. हे पाणी घरात स्प्रे करा. मच्छर दूर ठेवण्यासाठी तुम्ही हे देखील नैसर्गिक उपाय नक्की करून पहा.

मुंग्यांसाठी व्हाईट व्हिनेगर –
ऋतू कोणताही असो स्वयंपाकघरात मुंग्याचा वावर हमखास दिसतो. मग आता तुम्हांला मुंग्या दिसल्या की त्यावर थोडे व्हाईट व्हिनेगर स्प्रे करा. पण कार्पेट किंवा एखाद्या कापडावर व्हाईट व्हिनेगर मारण्याआधी ते छोट्याशा कापडावर मारून पहा. मगच त्याचा वापर करा.

झुरळ्यांपासून बचाव करण्यासाठी बोरीक पावडर  –
घरातून झुरळांना हटकण्यासाठी पेस्टकंट्रोलचा पर्याय निवड्याआधी हा प्रयोग नक्की करून पहा. चमचाभर गव्हाच्या पीठामध्ये बोरीक पावडर मिसळून तयार मिश्रणाचा गोळा मळा. त्याचे लहान लहान गोळे बनवून घरातील कोपर्‍यात ठेवा. या उपायामुळे झुरळांचा वावर कमी होण्यास  मदत होते. झुरळांमुळे होते अन्नविषबाधा ! मग त्यापासून बचावण्याचे 8 उपाय नक्की आजमवा.

सायट्रस सालींमुळे कोळी दूर राहतात –
कोळ्यांचा घरातील वावर वाढला की कोपर्‍यांमध्ये जळमट वाढतात. म्हणूनच त्यांना दूर करण्यासाठी संत्र, लिंबू, मोसंबी अशा सायट्रस फळांच्या सालींचा वापर करा. घराची सफाई झाल्यानंतर जेथे कोळ्यांचे जाळे आढळू शकते अशा ठिकाणी या सायट्रस फळांच्या साली चोळा. बुकशेल्फ, कोपरे,दारं खिडक्यांच्या आसपास या साली चोळाव्यात.

कापूरामुळे माश्या दूर राहतील –
कापूरामुळे घरातील माश्यांचा त्रास दूर  होतो. घरातील कोपर्‍यांमध्ये काही कापरांचे तुकडे टाकून ठेवा. जर घरात माश्या खूपच असतील तर कापूर जाळा. त्याच्या धुरामुळे मश्या दूर होतात.
पाल हा शब्द घरात कुणी ऐकला तरी सर्वांना पालीची भीती वाटते, पाल अंगावर पडली तर अनेकांना काम फुटतो.पालीला हाकलण्यासाठी विषारी लिक्विड उपलब्ध आहेत, पण त्याच्या वापर करताना कुणी दिसत नाही, विषारी लिक्विड असल्याने ते वापरले जात नसावे.

पालीला घराबाहेब पळवून लावण्यासाठी काही साधे उपाय आहेत, वाचा

१. कॉफी पावडर आणि तंबाखू
कॉफी पावडर आणि तंबाखू सोबत मिसळा आणि लहान लहान गोळे बनवून पाल जिथे येते तिथे ठेवा. हे मिश्रण पालीने खाल्ले तर तिचा मृत्यू होईल, अथवा पाल लांबपर्यंत पळ काढेल.

२. डांबर गोळ्या
डांबर गोळ्या उत्तम किटकनाशक असतात. यांना वॉर्डरोब अथवा वॉशबेसिनमध्ये टाका. पाल येणार नाही.

३. मोरपंख
पालींना मोरपंख पाहून साप असल्याचा भास होतो, असे म्हणतात. साप त्यांना खाऊन टाकेल या भीतीने त्या तेथून पळ काढतात. घराच्या फ्लॉवरपॉटमध्ये मोरपंख ठेवा, पाली पळून जातात.

४. पेपर पेस्टीसाईड्स स्प्रे
पाणी आणि काळी मिरची पावडर एकत्र करा आणि एक पेस्टीसाईड तयार करा. याला किचन, बाथरुम आणि इत्यादी ठिकाणी शिंपडून द्या. या वासाने पाल पळून जाते.

५. बर्फाचे थंड पाणी
बर्फाचे थंड पाणी पालीवर फेका. असे अनेक दिवस करत रहा. थंडावा सहन न झाल्याने पाल घर सोडून देईल.

६. कांदा
कांदा कापा आणि त्याला स्लाईसमध्ये लाईटजवळ टांगून द्या. यामुळे लाईटजवळ ठाण मांडून बसणारी पाल पळून जाईल. कांद्यात असणाऱ्या सल्फरमुळे त्यातून खूप दुर्गंधी येते आणि पाल पळून जाते.

७. अंड्याचे कवच
अंड्याच्या कवचाला अजिबात सुगंध नसतो, पण अंड्याला पाहून पालीला वाटते की हा कोणतातरी जीव आहे, आणि तो तिला हानी पोहचवू शकतो. या भीतीमुळे पाल पळून जाते.

८. लसूण
एक स्प्रे बॉटल घ्या. त्यात कां,द्याचा रस आणि पाणी भरुन घ्या. या त्या पाण्यात लसुणचा रस मिसळा. जिथे जिथे पाल येते तिथे तो रस स्प्रे करा. पालीला हा वास असह्य होतो. पाल पळ काढते