मोदींनी कधीच म्हंटले नाही की नोटा छापायला १० महिन्यापुर्वी चालु केल्या. मोदी, जेटलींचे व RBI ची भाषणे निट ऐकली तर कळेल….

घडलेल्या घडामोडी खालील क्रमाणे…

१) हवाला रॅकेट, काळा पैसा निर्मिती, अतिरेकी, नक्षलवादी यांच्या आर्थिक उलाढाली व त्यांना चाप लावण्यासाठी उपाययोजना यावर १० महिन्यापूर्वी पहिली बैठक झाली. त्यात आपल्या इंटेलिजन्स ने जाली नोटा व सारा काळाबाजार यावरिल सगळ्यांचा संबंध कसा आहे हे कमिटीला पटवुन दिले.

याआधीच्या सर्व पंतप्रधानांनाही हे रिपोर्ट दर काही महिन्यांच्या अंतराने दिले जायचे. पण त्यावर कोणीही काहीही केले नाही.

२) त्यानंतरच्या मिटींग मध्ये नविन नोटा व डिझाईन छापायचा विषय मांडण्यात आला. त्या वेळी रघुराम राजननी ५००, १०००, २०००, ५००० व १०००० च्या नविन नोटांचा प्रस्ताव दिला.

३) त्यातील फक्त ५०० व २००० चा प्रस्ताव मान्य करण्यात आला. मोदींनी त्यांचा प्लँन कोणालाही सांगितला नाही. नविन नोटा व डिझाईन छापायला पि. एम. वो. ने परवानगी दिली

४) नविन देशी कागद व देशी शाई बनवन्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी चौकश्या झाल्या व परिक्षनांनंतर ते फायनल झाले.

५) ६ महिन्यापूर्वी नविन नोटेच्या डिझाईनला सुरवात झाली व ते सप्टेंबरच्या शेवटी सर्व सुरक्षा गोष्टींसकट फायनल केले व ते मोदींना दाखवले. ४ सप्टेंबरला रघुराम राजन निवृत्त होऊन आता ऊर्जित पटेल RBI च्या गवर्नर पदी आले होते.

६) ऑक्टोंबर सुरवाती पासुन फक्त २००० च्या नव्या नोटा छापायला सुरवात झाली. तोपर्यंत ५०० च्या नव्या नोटे विषई सगळे काही रेडी करून ठेवले, पण छपाईचे आदेश मोदींनी राखुन ठेवले. याचे कारण जर लोकांना नविन नोट येते आहे हे कुठुनही समजले तर काळा पैसे वाले सतर्क होतील. जर २००० च्या नव्या नोटे बद्दल काहीही माहीती लिक झाली तर लोकांना फक्त वाटेल की सरकार नविन नोट बाजारात आणतेय. कुणालाही वाटणार नाही जुनी नोट बंद करणार.

सर्व प्रकारच्या सुरक्षा उपायानंतरही ऑक्टोबरच्या शेवटी एका चेस्ट मधुन २००० च्या नोटेचा १ फोटो व्हायरल झाला. पण त्याने काही फरक नाही पडला.

७) १० महिन्यांपासुन आर. बि. आय. ने सर्व बँकांना १०० च्या नोटांचा जास्त साठा व पुरवठा करायला सांगितला व त्यांच्याकडील साठ्याची माहीती काही दिवसांनंतर मागवायला सुरवात केली.

८) ८ तारखेपर्यंत देशातील सर्व करंसी चेस्ट व लाखो बँकांमध्ये २००० च्या नव्या नोटा पोचल्या होत्या. पण त्या वापरात कधी आणायच्या याचे आदेश रोखुन ठेवले होते.

९) ८ तारखेला नोटा बँकांमध्ये पोचल्या व इतर गोष्टी रेडी असलेली माहिती देण्यासाठी RBI च्या प्रमुखांनी मोदींची वेळ घेतली. ती संध्याकाळी ६ ची ठरली.

१०) मोदींनी सर्व मंत्र्यांना ६.३० वाजता मिटींग साठी येण्यास निमंत्रण दिले व मिटींग ही त्यांच्या जपान दौऱ्याविषई आहे असे कळवले.
नोटाबंदी विषय कोणालाही काही माहीत नव्हते.

११) मोदी, उर्जित पटेल, अरून जेटली व निवडक लोकांची बैठक झाली व सर्व रेडी असल्याचे RBI ने सांगितले.

१२) त्या नंतर ६.३० वाजता मोदींनी मंत्रीमंडळ बैठक सुरू केली ती सर्व मंत्र्यांचे फोन जप्त करून.

नोटा बंदी जाहीर करणार हे सगळ्यांना सांगितले. मोदीजी राष्ट्रपतींना भेटण्यास गेले व मोदी परत येईपर्यंत सगळ्यांना तिथेच बसून रहायला सांगितले गेले.

१३) पंतप्रधान राष्ट्राला संबोधून भाषण देणार आहेत म्हणून सरकारी चँनेलला तयारी करायला सांगितली.

१४) मोदीजी राष्ट्रपतींना भेटायला ७ वाजता गेले व त्यांची अनुमती घेऊन सरळ ८ वाजता सरकारी चँनेलच्या समोर उभे राहिले. सर्व गोष्टी फार गोपनीय ठेवण्यात आल्या होत्या.

१५) रात्री ८ वाजता मोदीजींनी नोटा बंदी जाहीर केली व भारतभर प्रामाणिक लोकांनी दिवाळी साजरी केली व २ नंबर वाल्यांना सुनामीचा भास झाला…

१६) नोट बंदीच्या सार्वजनिक घोषणे नंतरच RBI ला ५०० च्या नव्या नोटा मोठ्या जोमाने व पूर्ण ताकदीनिशी छापण्याचे आदेश दिले व या नव्या ५०० च्या नोटा २-३ दिवसात बँकांमध्ये पोचवण्यास सांगण्यात आले. या प्रमाणे ५०० च्या नव्या नोटा १४ तारखेपासुन बँकामधुन वितरणात सुरवात झाली.

१७) तसेच ९ तारखेला सर्व बँका बंद ठेऊन सर्व बँकांचे नेटवर्क इनकम टॅक्सच्या सर्वरशी जोडण्यात आले. व तांत्रिक गोष्टी तपासण्यात आल्या.

१८) २००० च्या नव्या नोटा ATM मध्ये भरण्यासाठी प्रत्येक ATM मध्ये तांत्रिक बदल करणे गरजेचे आहे पण ८ तारखेच्या आधीजर काही घडले असते तर सर्व गोष्टी जनतेला कळल्या असत्या. त्या गोपनीय ठेवण्यासाठी सर्व काळजी घेण्यात आली.

१९) ९ तारखेपासुन देशभरातील सर्व ATM मध्ये तांत्रिक बदल करणे युद्ध पातळीवर चालू आहे. पण आपली लोकसंख्या व ATM ची संख्या फार मोठी असल्याने थोडा वेळ हा जाणारच.

लोकांनी कोणत्याही पक्षाचा चष्मा न घालता व बिनबुडाचे आरोप करणाऱ्या राजकारण्यांच्या व अशा लोकांच्या बोलण्यात न अडकता स्वतःच्या सदसद-  विवेक बुद्धीचा वापर करून सर्व गोष्टी पहाव्यात व मगच आरोप करावेत.

या निर्णयाने देशाचे भले होणार आहे…

१-२ आठवड्याच्या त्रासाने जर पुढील सर्व आयुष्य सुखी होनार असेल तर मग हा त्रास सहन करायला काय हरकत आहे…

किमान आपल्या पुढच्या पिढ्या तरी चांगल्या सुखसुविधा उपभोगतील…

व आपल्याला धन्यवाद देतील.

बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात…