कडकनाध

कोंबडी पालन

उस्मानाबाद जिल्ह्यातील शिंदेवाड़ी गावात कड़कनाथ या काळ्या कोंबड़ीमुळे अर्थकारणच बदलत असून गावातील प्रत्येक घरात फ़क्त याच कोंबड़ीचे पालन केले जात आहे . घरातील परसबागेत वाढणारी ही कोंबड़ी महिलांसाठी साक्षात लक्ष्मीसारखी ठरत आहे .

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या 4 वर्षापासून सततचा दुष्काळ व नापिकी आहे यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण पुरते कोलमडले आहे यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने राबविलेला कड़कनाथ कोंबड़ी पालनचा विशेष उपक्रम शेतकरीला एक संजीवनी देणारा ठरला आहे . शिंदेवाडी या छोट्याशा गावात सर्व घरात कड़कनाथ या काळ्या कोंबड़ीचे पालन केले जाते यामुळे या गावाची ओळख बदलत असून महिलांना घरबसल्या रोजगार मिळत असल्याने आर्थिक मदत होत आहे .

मध्यप्रदेश मधील झांबूआ , धार व राजस्थानच्या बांसवारा डोंगरपुर अणि उदयपुर या आदिवासी भागातील असलेली कड़कनाथ कोंबड़ी दिसायला पूर्ण काळी , मांस व रक्त काळे .. नखा पासून पिसापर्यंत सर्वच काळ .. आयुर्वेदिक महत्व असल्यामुळ या कोंबड़ीच्या मांसाला व अंडयाला मोठी मागणी आहे .. या कोंबड़ीच्या त्वचा मांस व हाडात मेलँनीन जास्त असल्याने पूर्ण कोंबड़ीच काळी आहे . मध्यप्रदेशच्या आदिवासी भागात काळी मासी अश्या नावाने ओळखली जाणारी ही कोंबड़ी आता उस्मानाबादेत पाय पसरवत आहे .

कोंबड़ीच एक अंड 50 रूपयला व मांस एक हजार ते दीड हजार रूपये किलो असल्याने महिलांना आर्थिक फायदा मिळत आहे . घरातील परसबागेत ही कोंबड़ी घरातील सर्व कामे करीत महिला संभाळु शकतात त्यामुळे 10 कोंबड़ीच्या गटातुन दरमहा 7 हजार पेक्षा जास्त उत्पन्न मिळते अणि आलेल्या उत्पन्नमुळे घरातील रोजचा खर्च भागतो अस महिला सांगत आहेत . सामान्य अंडया सारख दिसणार हे कड़कनाथ कोंबड़ीच अंड अनेक रोगावर गुणकारी व चवदार आहे . दुर्मिळ आदिवासी भागात असणारी ही कोंबड़ी आता उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुर तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या घरात , परसबागेत वाढू लागली आहे . कोणतीही जाहीरात बाजी न करता कड़कनाथची अंडी घेण्यासाठी लोक गावोगाव महिलांचा शोध घेत येतात .

कड़कनाथ कोंबड़ीच्या कमी खर्चात घर बसल्या जास्त फायदा या अर्थकारणमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेने 75 टक्के अनुदान मधून 600 नवीन कोंबड़ी दिल्या आहेत त्यामुळे आणखी फायदा होणार आहे . 9 कोंबड़ी व 1 कोंबडा अश्या 50 च्या गटाचे वाटप करण्यात आले आहे . मोठ्या शहरातील वाढत्या मागणीमुळ या कड़कनाथ कोंबड़ीच्या अंडयाचा तुटवडा आहे. रोज अड्वान्स पैसे मिळत असल्याने ही कोंबड़ी ग्रामीण भागातील महिलांना विक्रीसाठी कुठे जायची गरज नाही . काळा रंग काळी जीभ अशुभ मानली जाते मात्र नखशिकांत काळी असलेली ही कड़कनाथ कोंबड़ी नावाप्रमाणे कड़क लक्ष्मी ठरत असुन पूर्ण अर्थकारणच बदलत आहे . अनेक जन ही कोंबड़ी व पालन व्यवसाय पाहण्यासाठी शिंदेवाडी या गावात येत फ़ोटो काढून मागणी करत असतात . घरात अगदी कमी जागेत हा कोंबड़ी पालन व्यवसाय करता येतो म्हणुन महिला हिला परसबागेतील लक्ष्मी म्हणत आहेत

बंगळुरच्या अन्न परिक्षण व संशोधन संस्थेत कड़कनाथ कोंबड़ीच्या मांस व औषधी गुणधर्मावर संशोधन झाल आहे . इतर कोंबड़ी पेक्षा कड़कनाथ कोंबड़ीमध्ये लेबेलिक एसिडच प्रमाण अधिक आहे म्हणुन हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिण्या जाड होण्याच प्रमाण कमी आहे शिवाय क्लोरेस्टिरॉल कमी असल्याने याच्या अंडी व मांसला मोठी मागणी आहे अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शीतलकुमार मुकने यांनी दिली

ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्याला सोनेरी झळाळी देणारया कड़कनाथ या काळ्या कोंबड़ीमुळ दुष्काळग्रस्त भागातील सगळ अर्थकारणच बदलतय.