Monthly Archives: February 2018

मराठी राजभाषा दिन २७-फेब्रुवारी

मराठी राजभाषा दिन २७-फेब्रुवारी

माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल माझी मराठी माऊली तिची विठोबा साऊली ज्ञाना, नामा, तुका एका उभे कैवल्य राऊळी माझा मराठी गुरार, त्याला अबीराचा वास माझ्यासाठी चंद्रभागा उरी कालवते घास माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ सळसळतो आतून माझ्या रक्तात पिंपळ