मराठी राजभाषा दिन २७-फेब्रुवारी

मराठी राजभाषा दिन २७-फेब्रुवारी

माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल माझी मराठी माऊली तिची विठोबा साऊली ज्ञाना, नामा, तुका एका उभे कैवल्य राऊळी माझा मराठी गुरार, त्याला अबीराचा वास माझ्यासाठी चंद्रभागा उरी कालवते घास माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ सळसळतो आतून माझ्या रक्तात पिंपळ

विक्रम वेताळ भाग १४ वा

विक्रमादित्य पुन्हा वेताळाचा पाठलाग करत स्मशानात पोचला.  झाडावरील प्रेत  उतरून  घेतले आणि ते पाठीवर घेवून उज्जैन नगरीकडे निघाला.कांही अंतर चालून गेल्यावर विक्रमादित्याच्या कानी वेताळाचा आवाज पुन्हा कानावर पडला! “ विक्रम उज्जैन अजून खूप दूर आहे, तिथे जाईपर्यंत मी तुला महाभारतातील  कुरूक्षेत्रावरील एक घटना तथा कथा सांगतो…… ” विक्रमा, तुला महाभारत माहीत असेलच. पण कुरुक्षेत्रावर अर्जून […]

शिक्षित राष्ट्र🔭समर्थ राष्ट्र

दिल्लीतील केजरीवाल सरकारची शैक्षणिक क्रांती. १ ) एकीकडे केंद्र सरकार शैक्षणिक बजेट मध्ये कपात करत आहे तर केजरीवाल सरकारने ऐतिहासिकरित्या शैक्षणिक बजेट मध्ये १०६% ने वाढ केली. म्हणजे दिल्लीच्या एकूण बजेट पैकी २४% पैसा फक्त शिक्षणासाठी खर्च केला जातो. २ ) नवीन ८००० पेक्षा जास्त सुसज्ज आधुनिक क्लासरूम्स बांधून तयार. ३ ) सरकारी शाळांमध्ये स्वीमिंग […]

न्यायाची ऐशी तैशी

खर्डा प्रकरणाच्या अनुषंगाने लिहिलेला माझा अप्रकाशित लेख. आवर्जून वाचा आणि प्रतिक्रिया कळवा. प्रज्ञा दया पवार अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने पंधरा दिवसांच्या अंतराने दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणांचा निवाडा केला. पंधरा दिवसांपूर्वीचा खर्ड्याचा आणि अलीकडेच लागलेला कोपर्डीचा निकाल. या दोन्ही प्रकरणांमध्ये काही बाबी समान होत्या तर काही बाबी सर्वस्वी भिन्न. यातल्या सर्वच बाबींची तपशीलवार यादी न करता […]

आमची पिढी

आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली… *टेप रेकॉर्डर* ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती. *मार्कशीट* आणि *टिव्ही*च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी. कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन *गाडी गाडी […]

आय टी चे मृगजळ : काय सत्य काय असत्य !! मराठी पालकांनी करावे तरी काय ?

आय टी चे मृगजळ : काय सत्य काय असत्य !! मराठी पालकांनी करावे तरी काय ?

– चिन्मय गवाणकर, वसई Chinmaygavankar@gmail.com ( प्रस्तुत लेखक स्वतः एका बहुराष्ट्रीय आय टी कम्पनी मध्ये कार्यरत असून ,या क्षेत्राचा १५ वर्षे अनुभव आहे .लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. काही मुद्दे कठोर भाषेत मांडले आहेत .यात कुठल्याही व्यवसायाचा अथवा व्यावसायिकाचा वैयक्तिक उपमर्द करण्याचा हेतू नाही .आपल्या मुलाला अथवा मुलीला “आय टी ” क्षेत्रात पाठवायला बघत […]

मराठी विलोमपद

सहज गंमत म्हणून ,………. मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच  असते जसे सरळ वाचताना…… 👇 १. चिमा काय कामाची २. भाऊ तळ्यात ऊभा ३. रामाला भाला मारा ४. काका, वाचवा, काका ५. काका, वाहवा ! काका ६. ती होडी जाडी होती ७. तो कवी डालडा विकतो ८. तो कवी मोमो […]

दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती

       इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्पा आणि कॉफीचा आस्वाद घेत होतो. तेवढ्यात एक माणूस आला आणि आमच्यासमोरील टेबलवर बसला. त्याने वेटरला बोलवले आणि ऑर्डर दिली. दोन कॉफी..एक माझ्यासाठी आणि एक त्या भिंतीवर बसणाऱ्यांसाठी.          माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी त्या व्यक्तीकडे  पाहू लागलो. वेटरने त्याला एकच कॉफी आणून […]

मायबोली मराठीचा त्रिवार जयजयकार असो !

कटू सत्य : स्वतःची *सही*सुद्धा मराठीत नसणाऱ्या, पण मराठीची वांझ तळमळ बाळगणाऱ्या तमाम मराठी बांधवांस थोर थोर शुभेच्छा.. A B C D सहज म्हणू शकणाऱ्या, पण मराठी शाळेत शिकूनसुद्धा अजूनही क ख ग घ पूर्ण म्हणता न येणाऱ्या मायमराठीच्या अडाणी लेकरांना कोपरापासून शुभेच्छा.. मॉलमध्ये गेल्यावर ‘ये कितने का है ?’ किंवा ‘हाऊ मच इट कॉस्टस […]

आयुष्यभराची प्रतिष्ठा एका अन्यायी कृतीमुळे गमवावी लागते…

🔸महाभारतातील युध्द संपवून श्रीकृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली… 🔸गुरू द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह यांना ठार मारणार्यांच्या बाजूने तुम्ही कसे काय उभे राहिलात ? 🔸श्रीकृष्णांनी उत्तर दिले… “ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले…” […]